Pimpri Corona News : वाचा, आपल्या भागात कोरोनाचे किती ॲक्टीव्ह रुग्ण ?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे प्रभागातील रुग्णसंख्येचा आलेख देखील खाली आहे. पालिकेच्या ‘ब’ प्रभाग कार्यालय हद्दीतील रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड परिसरात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 71 सक्रिय रुग्ण आहेत. तर, चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर, यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 हा भाग येत असलेल्या ‘फ’ प्रभाग हद्दीत सर्वात कमी म्हणजेच कोरोनाचे 14 रुग्ण आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची दुसरी लाट तीव्र होती. दुसरी लाट ओसरल्याने महापालिकेने निर्बंध शिथिल केले होते. परंतु, कोरोनाचा अधिक संसर्गक्षम असलेला डेल्टा आणि डेल्टा प्लस हा नवीन व्हेरिएन्ट आला. त्यामुळे पुन्हा निर्बंध लादले आहेत. शहरात दिवसाला तीनशेच्या आसपास नवीन रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती सक्रिय रुग्ण आहेत. त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा पुन्हा प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी रात्री प्रसिध्द केलेल्या नकाशानुसार ‘ब’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीतील रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर या भागात कोरोनाचे सर्वाधिक 71 सक्रिय रुग्ण आहेत.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय सक्रिय रुग्ण संख्या !

‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात 22 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात सर्वाधिक म्हणजेच 71 सक्रिय रुग्ण आहेत.

‘क’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात कोरोनाचे 30 रुग्ण आहेत.

‘ड’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे 44 सक्रिय रुग्ण आहेत.

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात 41 रुग्ण आहेत.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर, यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे सर्वात कमी 14 रुग्ण आहेत.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे 24 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ह’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्माफुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात 36 सक्रिय रुग्ण आहेत. असे आठ प्रभागाच्या हद्दीत एकूण 282 सक्रिय रुग्ण असल्याचे महापालिकेने सांगितले.

परंतु, शहरात सध्या 1 हजार 368 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 368 रुग्ण गृहविलगीकरणात असून 1 हजार सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचे महापालिकेने बुधवारी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले. त्यामध्ये महापालिका हद्दीबाहेरीलही काही रुग्णांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.