Ganeshotsav News : गणेशोत्सव मंडळांना पालिकेचे भाडे, परवानगी शुल्क माफ करा : सतीश मरळ

एमपीसीन्यूज  : कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर आर्थिक संकट कोसळले आहे. वर्गणी व देणग्यांचा ओघ आटला आहे. तरीही उत्सव साजरा करायचाच निर्धार मंडळांकडून करण्यात आला आहे. गणेशोत्सवाची परंपरा अखंडित सुरु राहावी यासाठी यंदाच्या वर्षी गणेशोत्सव मंडळांना पालिकेचे भाडे, परवानगी शुल्क माफ करण्याची मागणी शिवसेना यमुनानगर-निगडी विभागप्रमुख सतीश मरळ यांनी केली आहे.

यासंदर्भात मरळ यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात छोटी-मोठी उत्सव मंडळे पालिकेच्या मैदानात व इतरत्र परवानगी घेऊन मंडपाचे भाडे भरुन उत्सव साजरा करतात. मात्र, यंदा कोरोनाच्या आर्थिक संकटामुळे मंडपाचे व इतर परवानग्यांचे भाडे भरणे या उत्सव मंडळाच्या आवाक्याबाहेर आहे.

त्यामुळे यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी सर्व छोट्या-मोठ्या उत्सव मंडळांकडून मंडप भाडे, परवानगी शुल्क व इतर कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये, उलट ते माफ करावे व हिंदूचा हा सण परंपरेनुसार यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यास सहकार्य करावे, अशी मागणी मरळ यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.