Bhosari Crime News : मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ, पतीसह पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – मुलगी झाली म्हणून विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल 2016 ते जानेवारी 2021 दरम्यान भोसरी एमआयडीसी परिसरात हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी पिडित महिलेनं रविवारी (दि.23) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलेश विठ्ठल नलावडे, कविता विठ्ठल नलावडे, विठ्ठल हरिभाऊ नलावडे, शितल गोरख शेलार व गोरख शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेकडे वारंवार पैशाची मागणी केली. तसेच, मुलगी झाली म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करून मारहाण केली, असं फिर्यादीत म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.