Bhosari Crime News : भोसरी -पांजरपोळ येथे एसबीआयचे एटीएम फोडले

0

एमपीसी न्यूज – भोसरी परिसरातील पांजरपोळ येथील एसबीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले आहे. हा प्रकार आज (गुरुवारी, दि. 10) सकाळी उघडकीस आला.

पांजरपोळ येथे स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)चे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी एटीएम फोडून रोख रक्कम चोरुन नेली आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. चोरीला गेलेली रक्कम अद्याप समजू शकली नाही. बँकेचे तांत्रिक पथक याबाबतची माहिती काढत आहेत.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment