Chinchwad Crime News : विनामास्क प्रकरणी 98 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर  अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. असे असतानाही काही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत विनाकारण घराबाहेर पडत आहेत. यातील काहीजण मास्कचा वापर करीत नाहीत. अशा विनामास्क फिरणाऱ्या 98 नागरिकांवर पोलिसांनी बुधवारी (दि. 9) कारवाई केली.

एमआयडीसी भोसरी (24), भोसरी (02), पिंपरी (05), चिंचवड (04), निगडी (01), आळंदी (10), चाकण (14), दिघी (06), सांगवी (03), वाकड (01) हिंजवडी (12), देहूरोड (13), तळेगाव दाभाडे (00), तळेगाव एमआयडीसी (00), चिखली (00), रावेत चौकी (03), शिरगाव चौकी (00), म्हाळुंगे चौकी (00)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.