Bhosari Crime News : कंपनीत चोरी करणारा चोरटा अटकेत

0

एमपीसी न्यूज – कंपनीच्या भिंतीवर चढून कंपनीत चोरी करणाऱ्या चोरट्यांला पोलिसांनी अटक केली. या चोरट्याने 25 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथील जी सेंट्री फोर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि फोनिक्स इंजीनियर्स कंपनीत 39 हजार 492 रुपये किमतीच्या साहित्याची चोरी केली.

अभय अंबादास गोलाईत (वय 35, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत महादेव राजाराम व्हनागडे (वय 33, रा. आनंदनगर, देहू-आळंदी रोड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 एप्रिल रोजी पहाटे दोन ते चार वाजताच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांच्या कंपनीचा रस्त्याकडील बाजूच्या भिंतीवर चढून कंपनीचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. कंपनीतून 39 हजार 492 रुपये किमतीचे नऊ एस एस स्टीलच्या प्लेटा चोरून नेल्या. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment