Bhosari : दिव्यांग मुलांनी घेतला ‘तानाजी’ चित्रपटाचा आनंद

एमपीसी न्यूज- कोंढाणा किल्ला जिंकून आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाला मंगळवारी (दि. 4) 350 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने शिवसेना भोसरी विधानसभा व निलेश मुटके मित्र परिवार यांच्यातर्फे निगडीच्या अपंग विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना स्पाइन रोड येथील कार्निवल सिनेमागृहात तानाजी चित्रपट दाखविण्यात आला

छत्रपती शिवाजी महाराजांचे खास सरदार तानाजी मालुसरे यांची 4 फेब्रवारी 350 वी पुण्यतिथी साजरी झाली. निगडीच्या अपंग विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाच्या आठवणी सदैव जागृत राहाव्यात म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग मुलांनी तानाजी चित्रपटाचा आनंद लुटला.

यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख निलेश मुटके, विधानसभा समन्वयक प्रा दत्तात्रय भालेराव, विभाग प्रमुख विश्वनाथ टेमगिरे, रामदास गाढवे, संदीप टोके, दीपक सोनवणे, राजेंद्र खोसे, धनेश गांजवे, अभिजीत कसाळ, निवृत्ती अमुप, संभाजी शिंदे, राहुल बांगर, अक्षदा शेळके आदी शिवसैनिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.