PCMC : दिव्यांगांना मोफत बस पाससाठी 31 मेपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व प्रकारच्या (PCMC) दिव्यांग बांधवांना मोफत बस पास दिले जातात. या बस पाससाठी 3 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तर  14 मार्च ते 31 मार्चपर्यंत नवीन पास वाटप करण्यात येणार होते. परंतु, बऱ्याच क्षेत्रीय कार्यालयाकडून याद्या उपलब्ध झाल्या नसल्यामुळे प्रशासनाला 31 मेपर्यंत जुन्याच पासला मुदत वाढ द्यावी लागली आहे.

Maval : स्ट्राँग रूमच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घ्या; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

त्याबाबत प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने दिव्यांग बांधव नवीन पास घेण्यासाठी दिव्यांग भवन पिंपरी या ठिकाणी गेले असता पास उपलब्ध नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अध्यक्ष दत्तात्रय भोसले यांनी महापालिकेच्या दिव्यांग विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना ही परस्थिती सांगितली.

दिव्यांगांना प्रवासात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि सर्वांचे पास तयार होईपर्यंत  31 मे 2024 पर्यंत जुन्याच पासला मुदतवाढ देण्याचे ठरले. यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, महिला अध्यक्ष संगीता जोशी, रामचंद्र तांबे, ज्ञानदेव नारखेडे, रमेश पिसे, संतोष सोनवणे, प्रशांत नागे यांच्यासह अपंग बांधव उपस्थित (PCMC) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.