Bhosari : तो बायकोसोबत फोनवर बोलत होता तेवढ्यात चोरट्याने पळवला फोन

एमपीसी न्यूज : बोयकोशी फोनवर बोलत असताना (Bhosari) चोरटा दुचाकीवरून आला, अन त्याने हातातून फोन हिसकावून नेला, काही कळायच्या आत चोरटा पसार झाला, हा प्रकार भोसरी येथे टेल्को रोडवर शनिवारी (दि.17) रात्री घडला.

याप्रकरणी इजाज शरिफ शेख (वय 39, रा.औरंगाबाद) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून ड्यूक मोटार सायकलवरून आलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nigdi News: प्राधिकरणातील ‘त्या’ नेत्याला पक्षात घेवू नका; भाजप इच्छुकांची शहराध्यक्षांकडे एकमुखी मागणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मोबाईलवरून (Bhosari) पत्नीला बोलत होते. यावेळी ड्यूक या दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी काही कळायच्या आत फिर्यादीच्या हातातील फोन हिसकावून चोरटे पसार झाले. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात 15 हजार रुपयांचा मोबाईल चोरल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.