Nigdi News: प्राधिकरणातील ‘त्या’ नेत्याला पक्षात घेवू नका; भाजप इच्छुकांची शहराध्यक्षांकडे एकमुखी मागणी

एमपीसी न्यूज – एका पक्षाकडून सर्व काही (Nigdi News) मिळाल्यानंतर आता ‘मैत्री’च्या धाग्यातून भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या निगडी, प्राधिकरणातील एका नेत्याची राजकीय गोची झाल्याचे दिसते. कारण, प्राधिकरणातील भाजपच्या सर्व इच्छुकांच्या वतीने भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री अनुप मोरे यांनी ‘त्या’ नेत्याला पक्षात घेवू नका अशी हात जोडून भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्याकडे विनंती केली. त्यामुळे या नेत्याच्या संभाव्य भाजप प्रवेशाला तूर्तास तरी ब्रेक लागल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

MPSC Student Pune : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे नाही; तर स्थगिती

निगडी प्राधिकरण येथील भाजपच्या बूथ, शक्ती केंद्र प्रमुखाचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी पार पडला. शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर आर.एस.कुमार, माजी नगरसेवक राजु दुर्गे, माजी नगरसेविका शैलजा मोरे, शर्मिला बाबर यासह भाजपकडून महापालिका निवडणूक लढवू इच्छिणारे सर्व इच्छुक उमेदवार उपस्थित होते.

भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या या नेत्याने महापालिकेतील (Nigdi News) दोन महत्वाची पदे भोगली आहेत. त्यांचे भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेशदादा लांडगे यांच्याशी एका पक्षात असल्यापासून आणि दादा दुसऱ्या पक्षात गेल्यानंतरही पक्षविरहित मैत्रीचे संबंध कायम आहेत. मैत्रीदिन असो की मग आमदार महेशदादा यांच्या मुलीच्या विवाह सोहळा दरम्यान झालेल्या मित्रांच्या ग्रुप डान्समध्ये या नेत्याचा सक्रिय सहभाग होता. या मैत्रीच्या माध्यमातून या नेत्याला भाजप प्रवेशाचे वेध लागले आहेत.

भाजपच्या राज्यातील मुख्य नेत्याबरोबरही या प्राधिकरणातील नेत्याची गोव्यात गुप्त बैठक झाल्याची जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे त्यांचा भाजपप्रवेश निश्चित असल्याचे सांगितले जाते. पडद्यामागे घडत असलेल्या या जोरदार राजकीय घडामोडीमुळे प्राधिकरणातील भाजपचे जुने कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार अस्वस्थ असल्याचे दिसते. त्यातूनच भाजपच्या सर्व इच्छुकांनी एकमुखाने या नेत्याच्या संभाव्य भाजप प्रवेशाला विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. त्यामुळे मात्र भाजप प्रवेशासाठी उताविळ झालेल्या या नेत्याची राजकीय गोची झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.