MPSC Student Pune : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे नाही; तर स्थगित

एमपीसी न्यूज : पुण्यात आज एमपीएससी (MPSC Student Pune) विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. परंतु, या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे दिसून आले. या विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटीसा देखील पाठवल्या आहेत. परंतु, विधानसभेत त्यांच्या मागण्या मांडल्या गेल्याने विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले नसून स्थगित केल्याचे म्हंटले आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत; येत्या काही दिवसात विद्यार्थी आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मागण्या काय?

17 ऑक्टोबर 2022 रोजी राज्यसेवा आयोगाने मराठीमध्ये सिलाबस टाकले आहे. या गोष्टीला दोन महिने झाले. आणि आता म्हणत आहेत कि परिक्षा द्या. मुलांची दोन वर्ष कोरोनामध्ये गेली आहेत. मुलांना राइटिग देता येणार नाही. क्लास 50-60 हजार फि घेत आहेत. आम्हाला अशा परिस्थितीत परिक्षा देता येणार नाही. राज्यसेवा आयोगाने अभ्यासक्रमात ज्या चुका केल्या आहेत त्यात विद्यार्थ्यांचे नापास होण्याचे प्रमाण जास्त आहे. राज्य सेवा आयोगाने युपीएससीचा अभ्यासक्रम जशास तसा कॉपी केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांची मागणी इतकीच आहे, की मुलांना आधी अभ्यासक्रम समजू द्या; मगच परिक्षा घ्या.

आंदोलन स्थगिती का?

पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांना सांगितले, कि तुमच्या (MPSC Student Pune) मागण्या योग्य व्यक्ती पर्यंत पोहचवल्याने आम्ही आंदोलन थांबवले आहे. आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. ते आमच्या मागण्या मान्य करतील. अन्यथा आम्ही पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.