Bhosari : ज्वेलर्स शॉपचे शटर उचकटून अडीच लाखांचे दागिने लंपास

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – ज्वेलरी शाॅपचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 45 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी पावणेसहाच्या सुमारास आळंदी रोड भोसरी येथे उघडकीस आली आहे.

प्रसाद दिनकर माळवे (वय 29, रा. पुणे-आळंदी रोड, च-होली) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद यांचे आळंदी रोडवरील सनक्रेस्ट अपार्टमेंटमध्ये अनुष्का ज्वेलर्स हे दुकान आहे. शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास त्यांनी दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 2 लाख 45 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. सकाळी पावणेसहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.