Charholi : देशी बनावटी पिस्टल व जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – चऱ्होली खुर्द येथे कारवाई करत गुन्हे पोलीस शाखा युनीट 3 (Charholi)च्या पोलिसांनी सोमवारी (दि.12) एका 24 वर्षीय तरुणाला देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसासह अटक केली आहे.

हरीओम गणेश पांचाळ (वय 24 रा.आळंदी) असे अटक आरोपीचे नाव (Charholi)आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सागर बाळासो जैनक यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Talegaon : किरकोळ कारणावरून गाडी चालकाला शिवीगाळ करत गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या ताब्यात शस्त्र घेवून फिरत होता. याची खबर पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला चऱ्होली खुर्द येथील गायरान येथून अटक केले. यावेळी त्याच्याकडून 1 देशी बनावटीचे पिस्टल 1 जिवंत काडतुस असा एकूण 51 हजार रुपयांची शस्त्र जप्त केले. यावरून आळंदी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.