_MPC_DIR_MPU_III

Bhosari : वाढदिवशीच आमदारकीची शपथ ; महेश लांडगे यांच्यासाठी दुग्धशर्करा योग

एमपीसी न्यूज – आपल्या वाढदिवशीच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आज (बुधवारी) आमदारकीची शपथ घेतली आहे. लांडगे यांच्यासाठी हा दुग्धशर्करा योग मानला जात आहे. वाढदिवशीच दादांनी शपथ घेतल्याने कार्यकर्त्यांनी आंनदोत्सव साजरा केला.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

भोसरी विधानसभा मतदारसंघातून सलग दुस-यांदा महेश लांडगे आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी तब्बल 80 हजारांच्या मताधिक्याने लांडगे निवडून आले आहेत. 24 ऑक्टोबर रोजी लांडगे आमदार म्हणून निवडून आले. परंतु, सरकार स्थापन होत नसल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे आमदारांचा शपथविधी झाला नव्हता. निवडून येऊन देखील आमदारांना अधिकार प्राप्त झाले नव्हते.

त्यानंतर आज राज्यातील आमदारांचा शपथविधी पार पडला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या वाढदिवशीच आमदारकीची शपथ घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील आमदारकीची शपथ घेतली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.