Dehuroad : दिवंगत छायाचित्रकार किरण शिंदे यांच्या कुटुंबियांसाठी छायाचित्रकारांनी केली 42 हजारांची मदत

एमपीसी न्यूज- देहूरोड येथील नामवंत छायाचित्रकार किरण शिंदे यांचे शनिवारी (दि. 23) आकस्मिक निधन झाले. किरण शिंदे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने पिंपरी चिंचवड, देहूरोड, देहूगाव, तळेगाव, मावळ या ठिकाणच्या सर्व फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांनी मिळून 42 हजार रुपयांची मदत केली.

किरण शिंदे हे देहूरोड येथे फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीचा व्यवसाय करीत असत. या व्यवसायातून ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असत. किरण शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. किरण शिंदे यांच्या आकस्मिक निधनामुळे शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात शिंदे कुटुंबियांना मदत व्हावी या उद्देशाने देहूरोड, पिंपरी-चिंचवड देहूगाव मावळ या भागातील छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर्सना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत 42 हजार रुपयांची मदत गोळा करण्यात आली. सदरची रक्कम शिंदे यांच्या मुलीच्या नावाने बँक ऑफ इंडिया, देहूरोड शाखा येथे पाच वर्षाकरिता ठेव म्हणून ठेवण्यात आली. यावेळी शिंदे यांचे कुटुंबीय, देहूरोड फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष बाबु टैक्कल, फोटोग्राफर फौंडेशन ऑफ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष प्रशांत पासलकर, व्यंकटेश कानापुरम, जयराम सपकाळे, विजय सोनवणे, पवन मेंगजी, बन्सी गायकवाड, सन्याला शिंदे, संजय भोंडवे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.