Pimpri : पैसे खाली पडल्याचा बहाणा करत नागरिकाचे तीन लाख रुपये चोरले

एमपीसी न्यूज –  बँकेतून बाहेर पडत असताना नजर ठेवून पैसे खाली ( Pimpri)  पडल्याचा बहाणा करत नागरिकाचे तीन लाख रुपये चोरले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.28) पिंपरीतील बँक ऑफ इंडिया जवळ घडली आहे.

याप्रकरणी राकेश सेवनदास पारवानी (वय 52 रा. रहाटणी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात दिली  आहे. यावरून एका अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

Maval : आईला मारहाण करणाऱ्या मुलाला पोलिसांनी केली अटक

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बँकेतून पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपीने फिर्यादी वर नजर ठेवली. फिर्यादी बैशाची बँग घेवून बाहेर आले असता  आरोपीने फिर्यादी यांना त्यांचे पैसे खाली पडल्याचे सांगितले.

यावेळी फिर्यादी वाकून बघत असताना आरोपीने फिर्यादी च्या हातातील बॅग हातचालाखीने चोरून नेली. ज्यामध्ये तीन लाख रुपये होते. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत ( Pimpri) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.