Bhosari : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग; आरोपी अटकेत

Molestation of a woman who went to settle a quarrel; Accused arrested

एमपीसी न्यूज – भावासोबत विनाकारण भांडण करणा-याला समजावून सांगत भांडण सोडवत असलेल्या तरुणीशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याबाबत विनयभंग करणा-याला अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि. 15) रात्री साडेनऊ वाजता भोसरी येथे घडली.

निलेश कैलास जाधव (वय 34, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी यांच्या भावाशी विनाकारण भांडण करत होता. आरोपीने फिर्यादी यांच्या भावाला हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी गेल्या.

त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या भावाचा मोबाईल फोन आपटून फोडून टाकला. त्यानंतर फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला.

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.