Bhosari : अल्पवयीन मुलींशी लैंगिक चाळे करणाऱ्या इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- घरात बोलावून घेत दोन अल्पवयीन मुलींशी एकाने लैंगिक चाळे केले. या प्रकरणी मंगळवारी (दि.१६) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी सचिन चंद्रकांत पिल्ले (वय 40, रा.लांडे वस्ती, कासारवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिती मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिल्ले हा रिक्षाचालक आहे. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरात कोणी नसताना आरोपीने 10 व 11 वर्षाच्या दोन मुलींना घरात बोलावले. त्यांच्याशी लैंगिक चाळे केले. मुलींनी हा प्रकार घरी सांगितला असता त्यांच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.