Bhosari News: उघड्यावर कचरा टाकणाऱ्या मेडीकल व्यावसायिकाकडून 10 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – उघड्यावर कचरा टाकणा-या भोसरी -नाशिक हायवेवरील जयहिंद मेडीको या मेडीकल व्यवसायधारकाकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. ‘क’ क्षेत्रिय कार्यालयाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

‘क’ क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा आरोग्य अधिकारी बी.बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरिक्षक विजय दवाळे यांच्या पथकामार्फत करण्यात आली.

कोविड 19 संसर्ग टाळण्यासाठी शहराचा परिसर स्वच्छ ठेऊन नागरिकांनी रस्तावर थुंकु नये. उघड्यावर कचरा टाकू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.