Bhosari News : इंद्रायणीनगरमध्ये समग्र योगचिकित्सा शिबिर

एमपीसी न्यूज – इंद्रायणीनगर (भोसरी) येथील साई चौक मित्र मंडळ (Bhosari News) आणि श्री विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान यांच्या वतीने, तसेच पतंजली योग समिती पिंपरी चिंचवड यांच्या सहकार्याने 21 एप्रिल ते 25 एप्रिल 2023 या कालवाधीत दररोज पहाटे सव्वापाच ते सव्वासात या वेळेत सर्वांसाठी मोफत समग्र योगचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी दिली.

भोसरी इंद्रायणीनगर येथील वैष्णोदेवी मंदिर प्रांगणात हे शिबीर घेण्यात येणार आहे. यामध्ये योगासने, प्राणायाम, घरगुती आणि आयुर्वेदिक औषधे, ॲक्युप्रेशर, पंचकर्म, षटकर्म याची माहिती, विरेचन जलनेति, सूत्रनेति, आय वॉश, त्राटकसारखे विधी, विविध प्रकारच्या औषधींच्या सहाय्याने केलेल्या हवन विधी, यज्ञ चिकित्सा, आहार, दिनचर्या याची माहिती दिली जाणार आहे. यासह मधुमेह. मणक्याचे विकार, मान, पाठ, कंबरदुखी,उच्च रक्तदाब व हृदयविकार, थायरॉईड अशा आजारांना बरे करण्याचे मार्गदर्शन नागरिकांना करण्यात येणार आहे.

PCMC: सौंदर्यीकरणात शहराचा तिसरा क्रमांक, 5 कोटींचे बक्षीस

भोसरी, इंद्रायणीनगर, संतनगर आणि परसिरातीलया जास्तीत जास्त नागरिकांनी (Bhosari News) या शिबिरामध्ये सहभागी व्हावे. तसेच, विविध आजार व व्याधींवरील योग, प्राणायाम व आयुर्वेदिक उपचार पद्धती याबाबत मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावे, असे आवाहन विलास मडिगेरी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.