Pune : अक्षय तृतीयेच्या दिवशी शहरातील सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरु राहणार

एमपीसी न्यूज – अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांच्या (Pune) मागणीनुसार सह दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी शनिवारी (दि. 22) सुरू ठेवण्याचे निर्देश राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण हिरालाल सोनवणे यांनी दिले आहेत.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार करण्याची नागरिकांमध्ये भावना असते. त्यानुसार नागरिकांना जमीन, सदनिका आदी खरेदी विक्री करता यावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात काही ठराविक सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात सुरू ठेवावयाची कार्यालये निश्चित करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांच्या सह जिल्हा निबंधकांना देण्यात आले आहेत.

Bhosari News : इंद्रायणीनगरमध्ये समग्र योगचिकित्सा शिबिर

पुणे शहरात 5 सह दुय्यम निबंधक कार्यालये राहणार सुरू – Pune

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शनिवार (22 एप्रिल) आणि रविवार (23 एप्रिल) रोजी शहरात 5 सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये सिद्धी टॉवर दापोडी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्र. 17 आणि युगाई मंगल सभागृह एरंडवणे येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्र. 22 ही कार्यालये दुपारी 1 ते रात्री 8.45 वा., युगाई मंगल सभागृह एरंडवणे येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्र. 21 आणि सिद्धी टॉवर दापोडी येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्र. 25 ही कार्यालये सकाळी 7.30 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय इमारत येथील सह दुय्यम निबंधक हवेली क्र. 23 कार्यालय सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.