PCMC: सौंदर्यीकरणात शहराचा तिसरा क्रमांक, 5 कोटींचे बक्षीस

एमपीसी न्यूज – राज्य शासनाचा शहर सौंदर्यीकरण (PCMC) व नागरी प्रशासनातील विविध बाबींमध्ये उत्तम कामगिरीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचा तृतीय क्रमांक आला. महापालिकेला 5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.  पुरस्कार महानगरपालिकेला प्रदान करण्यात आला.

नगरविकास दिनानिमित्त महाराष्ट्र शासनामार्फत शहर सौंदर्यीकरण व नागरी प्रशासनातील विविध बाबींमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला जाणारा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्वीकारला.

Pune : उद्यापासून रंगणार रोलबॉल विश्व करंडक स्पर्धेचा थरार

राज्यात “शहर सौंदर्यीकरण” स्पर्धेत नागपूर महापालिकेला पहिला क्रमांक,  ठाणे महापालिकेला दुसरा क्रमांक तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेला तिसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास (PCMC) खात्याचा शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. नगरविकास दिनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा निकाल जाहीर करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, मनोज सेठीया, उपआयुक्त रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.