Bhosari News : लॉकडाऊनमधील निर्बंधांविरोधात हॉटेल व्यावसायिकांचे आंदोलन 

एमपीसीन्यूज :   कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारच्या ‘ब्रेक दी चेन’ अंतर्गत घालण्यात आलेल्या निर्बंधांना हॉटेल व्यावसायकांनी विरोध करीत आंदोलन केले. यावेळी हॉटेल व्यवसायावर लादलेले   निर्बंध मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी केली. 

भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली भोसरी येथील हवेली हॉटेलच्या  समोर हे आंदोलन करण्यात आले. भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष  संकेत चोंधे, सरचिटणीस दिनेश यादव, उपाध्यक्ष शिवराज लांडगे, भोसरी -चऱ्होली मंडल अध्यक्ष उदय गायकवाड आदी पदाधिकारी आणि हॉटेल व्यावसायिक  उपस्थित होते.

सध्याच्या मिनी लॉकडाऊनच्या निर्बंधांचं स्वरुप हे लॉकडाऊनप्रमाणे आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ येईल, असे आंदोलक हॉटेल व्यवसायिकांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी  दि. 7 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. याला  शहरातील व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध असून  या लॉकडाऊन विरोधात गुरूवारी (दि.8 एप्रिल ) व्यापारी वर्गाने   विविध ठिकाणी आंदोलन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.