Bhosari News : भोसरी एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज : भोसरी एमआयडीसी येथे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन (Bhosari News) साजरा करण्यात आला. यावेळी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजअसोसिएशन व हिंदुस्तान माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार सेना तर्फे कामगार बंधूंचा आणि भगिनींचा सन्मान करण्यात आला.

तसेच, सर्वांनी मिळून महाराष्ट्र दिनाचा जल्लोष साजरा केला. यावेळी भोसरी एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना व संयुक्त महाराष्ट्रात चळवळीत झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

भोसरी एमआयडीसीच्या संपर्क कार्यालय येथे अध्यक्ष अभय भोर भोसरी स्पाईन रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांची प्रमुख उपस्थिती होती. याबाबत आणि निकाळजे साहेबांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.  या प्रसंगी बोलताना अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले, की “कंत्राटदार मजुरांची कॉन्ट्रॅक्टर पिळवणूक करत असून त्या विरोधात कामगारांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कंपन्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट देतात, परंतु कॉन्ट्रॅक्टर मजुरांना कमी पगार देऊन त्यांच्यावर अन्याय करत असतात. तो बंद झाला पाहिजे.”

PCMC : महापालिका घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्र उभारणार

पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी कामगारांनी आपल्या न्याय हक्कासाठी संविधानाचा हक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला असून कायदा आणि न्याय व्यवस्था यांच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक कामगाराला कायदा माहिती झाला पाहिजे. तरच कामगारांवर होणारा अन्याय बंद होऊ शकेल असे प्रतिपादन केले.

दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्ष दुर्गा भोर यांनी महिला कामगारांना अद्यापही एमआयडीसी परिसरात मूलभूत सुविधा मिळत नसून सुरक्षा रक्षक काम करणाऱ्या महिलांना आजही 12 तास काम, तसेच एकही दिवस सुट्टी मिळत नसल्याची खंत (Bhosari News) व्यक्त करून त्यावर आता तीव्र आंदोलने उभारण्याचा विचार व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.