Alandi : एम.आय.टी. महाविद्यालयात जागतिक बौद्धिक संपदा दिन साजरा

एमपीसी न्यूज : आळंदी येथील एम.आय.टी. कला (Alandi) वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातिल इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलने 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिनानिमित एक दिवसीय कार्यशाळचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पेटंट कशा प्रकारे सादर करावे, विद्यार्थ्यांनी नवीन शोधाचे आणि कल्पनांचे संरक्षण कसे करावे, यावर मार्गदर्शन करण्यात आले. 

या कार्यशाळेला प्रा. कुणाल सरपाल (ट्रेडमार्क आणि पेटंट अ‍ॅटर्नी) यांनी विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदा अधिकार आणि बौद्धिक संपदा संरक्षण कसे करावे याबद्दल अर्थपूर्ण समज प्रदान केली व बौद्धिक संपदा अधिकाराच्या क्षेत्रातील आगामी आव्हाने आणि संधींना सामोरे जाण्यासाठी व पेटंट मसुदा, पेटंट कसे दाखल करावे, पेटंट नोंदणीसाठी आवश्यक असलेली महत्त्वाची कागदपत्रे कोणती यावर या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

Bhosari News : भोसरी एमआयडीसीमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात संपन्न

या कार्यशाळेमध्ये सर्व विद्याशाखेतील विद्यार्थीनी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. प्राचार्य डॉ. बी.बी. वाफरे याच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.अक्षधा कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्टार्ट-अप अँड इनोव्हेशन सेलच्या प्रमुख आणि आयआयसी संयोजक प्रा.अभिजित नेटके यांनी केले.

प्रा. पल्लवी बोंगाणे यांनी वक्तांचा परिचय करून दिला. प्रा. प्रिती भारंबे यांनी आभार प्रदर्शन केले. डॉ. अमोल माने, डॉ अर्चना आहेर प्रा.आकांशा लांडगे, प्रा.संजय गुंजाळ, प्रा.वसंत करमड, प्रा.कविता महाजन यांनी ही कार्यशाळ यशस्वी रित्या पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतले. याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.