Bhosari News : सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन

एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये (Bhosari News) पिंपरी- चिंचवड शहर देशात अव्वल स्थानावर येण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व विभाग यांच्या कामकाजाचे स्वरुप व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. याबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी दोन टप्प्यांत 4 ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये ‘इ’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सफाई कर्मचा-यांचे प्रशिक्षण आज (गुरुवारी) आयोजित करण्यात आले होते. यावेळी आरोग्य विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर, ‘इ’ क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक विनोद जळक, सहायक आरोग्याधिकारी राजेश भाट, मुख्य आरोग्य निरीक्षक एस.एस. गायकवाड, आरोग्य निरीक्षक एस.बी. चन्नाल, उद्धव डवरी, शैलेंद्र तवर, भूषण शिंदे, योगेश फल्ले, राकेश सोदरी, कॅम फाउंडेशनचे प्रणव टोम्पे, बेसिक्स या माध्यम संस्थेचे प्रतिनिधी तसेच सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YCMH : किडनीचे आजार, मधुमेह, पक्षघात व मज्जातंतू संदर्भातील आजारांची माफक दरात तपासणी होणार

या कार्यक्रमात ‘इ’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिनस्त असलेल्या ऑक्टोबर 2022 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना उपआयुक्त अजय चारठाणकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सफाई कर्मचा-यांना प्रातिनिधिक स्वरुपात पिपीई किटचे वाटप करण्यात आले. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रियांका कापोरे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मोफत रोजगारभिमुख शिक्षण आणि कोर्सेसबद्दल माहिती यावेळी सांगितली.

भोसरी येथील सिद्धेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी (Bhosari News) उपस्थित मान्यवरांचे स्वागतगीताद्वारे स्वागत केले. तसेच झिरो वेस्टवर आधारित कविता देखील त्यांनी सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक विनोद जळक यांनी केले. सूत्रसंचालन पौर्णिमा भोर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.