Chikhali News : स्वच्छतेविषयी जनजागृतीबाबत रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या (Chikhali News) वतीने प्रभाग क्र. 2 जाधववाडी येथील बालघरे वस्ती येथे स्वच्छ सर्वेक्षण 2022-23 चे अनुषंगाने स्वच्छतेविषयी जनजागृतीबाबत आयोजित रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सकाळी 10 ते 12 या वेळेत आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये दैनंदिन निर्माण होणा-या कच-याचे वर्गीकरण ओला व सुका कचरा या स्वरूपातच पालिकेच्या येणा-या कचरा गाडीमध्ये देणेबाबत सर्व नागरिकांना आवाहन करणेत आले. तसेच या मोहिमेमध्ये स्वच्छतेचे ‘दोन रंग हरा गिला, सुका निला’, थोडीतरी ठेवा जाण सार्वजनिक ठिकाणी होणार नाही घाण, तसेच प्लास्टिक हटवा, शहर वाचवा याबाबत संदेश देण्यात आले. तसेच, उपस्थित नागरिकांना जनजागृतीमध्ये प्लॉस्टिक बंदीबाबत माहिती देण्यात आली.

Bhosari News : सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन

या उपक्रमामध्ये सदर भागातील सामाजिक कार्यकर्ते विशाल बालघरे, संभाजी बालघरे व दिपक ठाकूर व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. या मोहिमेनिमित्त ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहा. आयुक्त अण्णा बोदडे यांनी स्वच्छतेविषयक व प्लॅस्टिक बंदी विषयक तसेच कचरा विलगीकरणाबाबत आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थितीतांना आपले पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ ठेवणेस सहकार्य करावे (Chikhali News) असे आवाहन केले.

सदर उपक्रमामध्ये ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहा. आरोग्याधिकारी तानाजी दाते, मुख्य आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजिनवाल, प्रभाग क्र 2 चे सहा. आरोग्य निरीक्षक संदीप राठोड व अमोल घुसर तसेच मनपा अधिकारी आणि कर्मचारी तसेच परिसरातील नागरिकांनी सहभाग घेऊन सदर कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.