Cinet Election : संघटनशक्ती आणि पूर्व नियोजनामुळे पुण्यात दुप्पट मतदान – राजेश पांडे

एमपीसी न्यूज – संघटनशक्ती आणि पूर्व नियोजनामुळे पुण्यात (Cinet Election) दुप्पट मतदान झाल्याचा दावा विद्यापीठ विकास मंच समनवयक राजेश पांडे यांनी केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभेच्या निवडणुकीत यंदा 71 मतदान केंद्रांवर केंद्रे होती. यामध्ये पुणे शहर येथे 26, पुणे ग्रामीण येथे 10, अहमदनगर 15, नाशिक 19 तर सिल्वासा येथे एक मतदान केंद्र होते. 71 केंद्रांवर मिळून एकूण 114 बूथ होते. विद्यापीठ विकास मंचच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथवर स्वतंत्र यंत्रणा अंमलात आणली होती.

विद्यापीठ विकास मंच समनवयक राजेश पांडे यांनी म्हंटले, की अभाविपमध्ये आम्ही शिकलो, ‘पूर्व नियोजन, पूर्ण नियोजन’, त्याचं प्रत्यक्ष अनुभव या निवडणुकीच्या निमित्ताने आला. शिक्षण क्षेत्रात तळमळीने काम करू इच्छिणाऱ्या मंचच्या सदस्यांना शिक्षणाविषयी आस्था असलेल्या समविचारी घटकाने खंबीर साथ दिली. या सर्व निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांना भाजयुमोच्या सहकाऱ्यांची बहूमोल साथ लाभली. शहरातील नगरसेवकांनीही निवडणूक प्रक्रियेत हातभार लावला. हे सगळ्या टीमचं यश आहे. हा आमच्या संघटनशक्तीचा उत्तम नमुना आहे. त्यामुळेच प्राचार्य, संस्थाचालक, पदवीधर अशा तिन्ही ठिकाणी अधिसभेवर विद्यापीठ विकास मंचचा प्रभाव यंदाच्या निकालातून दिसतो आहे.

Chikhali News : स्वच्छतेविषयी जनजागृतीबाबत रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

या विजयाचे खरे शिल्पकार मंचाचे (Cinet Election) सर्व मान्यवर, आवाहक डॉ.गजानन एकबोटे, डॉ.राजेंद्र विखे पाटील, डॉ.अपूर्व हिरे, डॉ.सोमनाथ पाटील, अॅड.नितीन ठाकरे, अॅड.एस.के.जैन, डॉ. सुधाकर जाधवर, बेबीलालजी संचेती, अजितभाऊ सुराणा, दिलीप बेलगांवकर, बापू येवला, हेमंत धात्रक, पंढरीनाथ थोरे, हेमलता बिडकर, डॉ.संदीप कदम, प्रा.एन.डी.पाटील, अनिल ठोंबरे, डॉ.प्रशांत साठे यांच्यासह अनेक मित्र आणि सहकारी वर्ग तसेच विविध संस्थांचे प्राध्यापक आणि इतर कर्मचारी बांधव हे आहेत. तसेच प्रसारमाध्यमांनीदेखील आमची भूमिका अतिशय योग्य पद्धतीने मतदार आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचविली. ज्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, असे मतदार बंधु-भगिनी, निवडणुक अधिकारी आणि कर्मचारी तसेच ज्ञात-अज्ञात सर्व हितचिंतक या सर्वांचे राजेश पांडे यांनी आभार मानले.

विद्यापीठ प्रशासनाचे आभार – Cinet Election 

विद्यापीठ प्रशासनातर्फे निवडणूक प्रक्रिया आणि मतदान मोजणी प्रकीया नियोजनबद्ध पद्धतीने राबविली. मतमोजणी प्रक्रियेचे संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. मोजणीच्या सोळा फेऱ्या यावेळी पार पडल्या. खुल्या प्रवर्गाची मोजणी बुधवार पहाटे साडेचार वाजेपर्यंत सुरू होती. संपूर्ण मतमोजणी पूर्ण होण्यासाठी सुमारे वीस तास लागले. विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विशेष कार्याधिकारी प्रमोद भडकवाडे, निवडणूक अधिकारी डॉ. वैशाली साकोरे, ज्ञानेश्वर साळुंखे, प्रदीप कोळी आदी मान्यवर प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांनी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्याबद्दल राजेश पांडे यांनी सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.