Pune News : 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना पोलीस मित्र संघटनेच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रम

एमपीसी न्यूज – 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील (Pune News) शहिदांना तसेच त्यात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना पोलीस मित्र संघटनेच्या वतीने शुक्रवार दि. 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता बालगंधर्व चौक, झाशीची राणी पुतळ्याजवळ पुष्पचक्र व मेणबत्या लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

Pimpri News: माजी महापौर मधुकर पवळे यांना अभिवादन

या कार्यक्रमास पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अतिरेकी कसाबला जिवंत पकडताना त्याच्या गाडीत असलेले व कसाबच्या गोळ्यांनी जखमी झालेले सहा.पो.निरीक्षक अरुण जाधव, शहिदांचे कुटुंबिय, वरीष्ठ पोलीस अधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, पत्रकार असे नागरिक सहभागी होणार आहेत. यावेळी पुष्पचक्र वाहून व मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

यावेळी रुग्णवाहीकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. अशी (Pune News) माहिती राजेंद्र कपाेते (अध्यक्ष, पोलीस मित्र संघटना, महाराष्ट्र राज्य) यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.