Bhosari : अपना वैश्य समाजाच्या वतीने मासिक सत्यनारायण कथेचे आयोजन

एमपीसी न्यूज – अपना समाज व अग्रसेन भगवान चॅरीटेबल फाऊंडेशनच्या वतीने (Bhosari) मासिक सत्यनारायण पूजेचे माघी पौर्णिमे निमीत्त रविवारी (दि.5) आयोजन केले आहे. ही पुजा भोसरी येथील पुना पांजरपौळ ट्रस्ट यांच्या गो शाळेत होणार आहे.

बदलत्या काळातही जुन्या रिती परंपरा कायम रहाव्यात, पुढील पिढीला धर्म संस्कृतीच्या कथा कळाव्यात यासाठी या पुजेचे आयोजन केले आहे. यामध्ये सत्यनारायण सामुहिक कथा, हनुमान चालिसा पठण आणि गायीची पूजा होणार आहे.

यासाठी जे पुजेचे यजमान असतील ते 1 हजार 100 रुपये देणार आहेत, इतर भाविकांनाही योगदान देण्याचे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. मात्र ते योगदान 1 हजार 100 पेक्षा कमी असावे असेही संस्थेकडून सांगण्यात (Bhosari) आले आहे.

Pune News : पुणे पोलिस दलातील पोलीस उपनिरीक्षकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

ही पूजा रविवारी सायंकाळी 6 ते रात्री आठपर्यंत होणार आहे. तर, सहा वाजता गायीची पूजा, साडे सात वाजता आरती होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अपना वैश्य समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.