Pune News : पुणे पोलिस दलातील पोलीस उपनिरीक्षकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

एमपीसी न्यूज –  पुणे  वाहतूक पोलीस दलातील पोलीस (Pune News) उपनिरीक्षक सुनिल मोरे यांचे शुक्रवारी (दि.3) दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुनिल मोरे हे चतु:श्रृंगी वाहतूक विभागात कार्यरत होते.

Pune Bypoll Election : कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपा सहयोगी पक्ष पूर्ण ताकदीने लढणार – चंद्रकांत पाटील

पोलीस उपनिरीक्षक सुनिल मोरे हे दुपारी जेवण करण्यासाठी जात असताना त्यांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला. यामध्ये मोरे यांची प्राणज्योत मालवली.(Pune News) सुनील मोरे यांना नुकतीच खात्यांतर्गत पदोन्नती मिळाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.