Bhosari : सोसायटी फेडरेशनच्या प्रत्येक हाकेला आमदार महेश लांडगे यांची सकारात्मक साद (व्हिडिओ)

चिखली, मोशी, च-होली हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या सदस्यांची प्रतिक्रिया

एमपीसी न्यूज- वाढत्या शहरीकरणासोबत समस्याही वाढल्या. त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी केला. व्हिजन 2020 अंतर्गत हा संकल्प पूर्णत्वास येत आहे. परिसरातील नागरिक आणि प्रशासन यांची प्रत्यक्ष भेट घडवून थेट प्रशासनासमोर समस्या मांडल्या तर त्यावर अधिक प्रभावीपणे काम होते, या हेतूने आमदार महेश लांडगे यांनी थेट संवादाचे आयोजन केले. सोसायटी फेडरेशनच्या प्रत्येक हाकेला आमदार महेश लांडगे यांनी सकारात्मक साद देत सर्व अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याच्या प्रतिक्रिया चिखली, मोशी, च-होली हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या सदस्यांनी व्यक्त केल्या.

फेडरेशन सदस्या माधुरी श्रीनिवास गुत्तीकोंडा म्हणाल्या, “सोसायटीधारकांना नागरी समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. त्या आधारे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त आणि सोसायटींचे अध्यक्ष व सचिव यांचा संवाद कार्यक्रम घेतला होता. त्याआधारे सोसायटीधारकांनी आपल्याला भेडसावणार्‍या समस्या आयुक्तांसमोर मांडल्या. त्यातील बहुतांशी समस्या प्रशासकीय पातळीवर सोडवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सोसायटीधारकांमध्ये समाधानाची भावना आहे.

माधुरी पुढे म्हणाल्या, “शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि नागरी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या उपस्थितीत केवळ सोसायटीधारकांसाठी ‘मुक्तसंवाद’ हा उपक्रम आयोजित केला. सोसायट्यांमधील नागरिकांनी थेट पोलीस आयुक्तांकडे आपल्या तक्रारी मांडल्या आहेत. त्यावर देखील पोलीस प्रशासन कारवाई करीत आहे.”

वंदना कोलुरू म्हणाल्या, “भोसरी विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत. चिखली, मोशी भागातील 351 सोसायट्यांनी मिळून ‘सोसायटी फेडरेशन’ची स्थापना केली आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हद्दीतील सेक्टर 1 ते 22 मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्राधिकरण प्रशासन व सर्वसामान्य नागरिक यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी ‘प्राधिकरणासोबत संवाद’ उपक्रम घेतला. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात संबंधित अधिका-यांनी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करुन कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

नागरिकांच्या समस्यासोडवण्यासाठी सोसायटी फेडरेशन हे प्रभावी व्यासपीठ आहे. पिंपरी-चिंचवड शहर अस्तित्त्वात आल्यापासून प्रथमच प्रशासनाशी संवादाचा उपक्रम राबविल्यामुळे प्रशासकीय पातळीवर होणारे दुर्लक्ष कमी झाले आहे. बांधकाम व्यावसायिकाकडून होणारी नागरिकांची पिळवणूक कमी झाली आहे. कामचुकार अधिकार्‍यांना जरब बसली आहे. गृहप्रकल्पांना बेजबाबदारपणे दिले जाणारे दाखले बंद झाले. तसेच समस्या मांडणे आणि सोडविण्यामध्ये सुसूत्रता आली आहे, असेही वंदना यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.