Bhosari : भोसरी येथे गुरु नमन महोत्सव मंगलमय वातावरणात संपन्न

एमपीसी न्यूज – बसव सेवा संघाच्या वतीने (Bhosari) श्री सिद्धेश्वर महास्वामीजींच्या स्मरणार्थ गुरू नमन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कै. अंकुश लांडगे नाट्यगृहात रविवारी (दि.26) येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

कर्नाटक येथील ज्ञान योगाश्रमाचे प्रमुख बसवलिंग महास्वामीजी, पूज्य अमृतानंद स्वामी, हर्षानंद स्वामी,पूज्य श्रध्दानंद स्वामी, आत्माराम स्वामी,पूज्य ईश प्रसाद स्वामी, तसेच डी वाय पाटील मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ पी.डी पाटील,ज्येष्ठ विचारवंत डॉ विजयालक्ष्मी बाळेकुंद्री, डेप्युटी कलेक्टर अमृत नाटेकर, शिवलिंग ढवळेश्वर, बसव सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरगौडा बिरादार आदी उपस्थित होते.

बसव सेनेबद्दल माहिती देताना अध्यक्ष राम नाईक म्हणाले कि, या संस्थेची स्थापना दि 14 जानेवारी 2001 रोजी बसवेश्वरांचे जन्मस्थान बसवन बागेवाडी येथे समाज हितासाठी केली. या संस्थेचे उदघाटन महान ज्ञानयोगी परमपूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते करण्यात आले.

हि संस्था 2003 पासून पुणे शहरात सामाजिक उपक्रमांचे आयोजन,बसवादी शरण तत्त्वांचा प्रसार करणे, नागरिकांमध्ये (Bhosari) धार्मिकता देशभक्ती, नितीमत्तेचे बिज पेरणे आणि सामाजिक सुधारणेसाठी, स्वाभिमानी संघर्षाची भावना रुजवत असू, बसव मेळाव्याचे आयोजन करते. समाजाच्या विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींना ‘बसवभूषण’ पुरस्कार देऊन गौरव करतात, असेही नाईक म्हणाले.

Express Way : मंगळवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील दोन लेनवरील वाहतूक एकाच लेनवर

परमपूज्य बसवलिंग महास्वामीजी म्हणाले सिद्धेश्वर स्वामींना अध्यात्माची आवड असल्याने वयाच्या 14 व्या वर्षी पूज्य श्री मल्लिकार्जुन शिवयोगी यांचे ते शिष्य बनले. त्यांनी आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर आध्यात्मिक प्रसार व प्रचार केला. बसवेश्वर यांचा विचार तळागाळातल्या भाविकांपर्यंत पोचवला.

मात्र हे करीत असताना अद्याप कुठल्याही पदाचा, पैशाचा,धनसंपत्तीचा मोह धरला नाही.कर्नाटकात अनेक आश्रम निर्माण केले.त्यातून त्यांनी त्यागी, योगी, निस्वार्थी हजारो साधक तयार केलेत, असेही महास्वामीजी यांनी सांगितले.

दीप प्रज्वलन व मंगलद्वनीने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. प्रार्थना व शेलार ग्रुप ऑफ कंपनीज आयोजित महाप्रसाद कार्यक्रमाचे सांगता झाली. विश्वनाथ शेलार, शंकरगौडा हादिमनी,नंदकुमार साळुंखे,शिवान्ना नरुनी , आनंद जक्कनवर, अजय जाधव,युवराज कनवी, महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष श्रम घेतले. माया चिक्केरुर यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.