Chinchwad : चालक नसल्याचे कारण नको, प्रसंगी अधिकाऱ्यांनी सरकारी वाहन चालवावे

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना सुनावले

एमपीसी न्यूज – वाहन चालक नसल्याने (Chinchwad) अनेक सरकारी वाहने पोलीस ठाण्यांच्या आवारात उभी आहेत. याचा गस्तीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रभारी पोलीस निरीक्षकांना खडेबोल सुनावले. चालक नसल्याचे कारण नको. प्रसंगी अधिकाऱ्यांनी देखील सरकारी वाहन चालवावे, अशा सूचना आयुक्त चौबे यांनी निरीक्षकांना दिल्या.

पिंपरी-चिंचवड पोलिसांची आयुक्तालय स्तरावरील गुन्हे आढावा बैठक शनिवारी (दि. 26) निगडी येथे पोलीस मुख्यालयात पार पडली. या बैठकीत आयुक्तालय हद्दीतील गुन्हे, तपास, विविध कारवायांचा आढावा पोलीस आयुक्तांनी घेतला.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची सन 2018 मध्ये सुरुवात झाली. आयुक्तालयाच्या सुरुवातीपासून मागील वर्षापर्यंत वाहनांची कमतरता जाणवत होती. त्यामुळे गस्तीसह तपास पथकाच्या देखील कामकाजावर परिणाम जाणवत होता. मधल्या काळात जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झालेल्या निधीमधून तसेच कंपन्यांच्या सीएसआरमधून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला मोठ्या प्रमाणात वाहने मिळाली.

या वाहनांमुळे आयुक्तालयाची वाहनांची कमतरता पूर्ण झाली आहे. तरीही गस्तीवर त्याचा परिणाम दिसत नाही. याचा आढावा घेताना वाहने आहेत मात्र चालक नसल्याचे कारण समोर आले.

Bhosari : भोसरी येथे गुरु नमन महोत्सव मंगलमय वातावरणात संपन्न

पुरेशी वाहने नसल्याबाबत सातत्याने तक्रार करण्यात येत होती. त्याबाबत पोलीस आयुक्त चौबे यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे (Chinchwad) नव्याने वाहने उपलब्ध झाली आहेत. मात्र, चालक नाही, असे कारण सांगत पोलीस ठाण्यांमध्ये ही वाहने पडून आहेत. याबाबत पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षकांना खडेबोल सुनावले.

तुम्ही स्वत: वाहन चालवत नाहीत का?, तुमच्या पोलीस ठाण्यांमधील अधिकारी, कर्मचारी त्यांचे वाहन चालवतात. मग हे सरकारी वाहन देखील चालवावे. वाहने पोलीस ठाण्यांमध्ये उभी ठेवू नयेत. त्यांचा वापर करून गस्त वाढवावी, अशी सूचना आयुक्तांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.