Bhosari : पादचारी तरुणीचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असणाऱ्या तरुणीचा अज्ञात चोरट्याने मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना बुधवारी (दि. 13) दुपारी पावणे सहाच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे घडली.

रेश्मा मुजावर शेख (वय 30, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) यांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेश्मा बुधवारी दुपारी पावणे सहाच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथील उषाकिरण हॉटेल चौकातून पायी चालत जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अनोळखी चोरट्याने त्यांच्या हातातील सात हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसका मारून चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.