Bhosari : पूर्ववैमनस्यातून दोघांवर कोयत्याने वार; नऊ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

The two were stabbed in the forearm; Filed a case against a gang of nine

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून नऊ जणांच्या टोळक्‍याने दोघांवर कोयत्याने वार केले. ही घटना पांजरपोळजवळ, भोसरी येथे बुधवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली.

शहाजी दांडे (वय 28), तानाजी दांडे (वय 22), रवी जाधव (वय 25), महेश उपाडे (वय 23), भीम धनसिंग थापा (वय 22), विठ्ठल निठुरे (वय 35) आणि त्यांचे तीन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी शहाजी आणि तानाजी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

बाळू दशरथ पवार (वय 26, रा. शांतीनगर वसाहत, भोसरी) असे हल्ल्यात जखमी झालेल्यांचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास फिर्यादी बाळू पवार आणि त्याचा मित्र आकाश मिसाळ हे दोघेजण दुचाकीवरून जात होते. ते पुणे नाशिक महामार्गावर पांजरपोळ येथे आले असता दुचाकी व कारमधून आलेल्या आरोपींनी बाळू पवार याच्या दुचाकीला पाठीमागून धडक देऊन त्यांना खाली पाडले.

पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी बाळू व त्याचा मित्र आकाश मिसाळ यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like