Pune : आयुक्तांच्या पुरवणी अंदाजपत्रकाला स्थायी समिती अध्यक्षांचा विरोध

Standing Committee Chairman opposes the Commissioner's Supplementary Budget

आमच्याच अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करणार : हेमंत रासने

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुरवणी अंदाजपत्रक मांडणार असल्याचे सांगितले होते. त्याला स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी विरोध केला आहे. आमच्याच बजेटची अंमलबजावणी करणार असल्याचे रासने यांनी पत्रकारांना ठणकावून सांगितले.

रासने म्हणाले, आता 2 महिने झाले आहेत. आणखी 10 महिने बाकी आहेत. त्यामुळे महापालिकेचा महसूल वाढणार आहे.

2020 – 21 चे 7 हजार 390 कोटींचे बजेट स्थायी समिती अध्यक्षांनी मांडले होते.

महापालिकेचे स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय, चांदनी चौक उड्डाणपूल, एचसीएमटीआर, जायका, शिवसृष्टी, पंतप्रधान आवास योजना, गावांचा समावेश, शहराच्या विविध भागांत उड्डाणपूल, बालगंधर्व पुनर्विकास, 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, शिवसृष्टी, आशा अनेक योजनांचे स्वप्न दाखविण्यात आले होते.

यातील सर्वच प्रकल्प सध्या कागदावर आहेत. कोरोनाच्या संकटाने महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने या प्रकल्पांचे काय होणार, निवडणुकीत भाजपने पुणेकरांना अनेक आश्वासने दिली होती.

दरम्यान, कोरोनाचे संकट असले तरी महसूल वाढविण्यावर स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने ठाम आहेत. तर, शासनाकडून मिळणाऱ्या जीएसटीच्या निधीमध्ये मोठी कपात झाली आहे. बांधकाम शुल्क आणि मिळकत कराचे उत्पन्नही कमी झाले आहे. शासनाने अनावश्यक कामे न करण्याचा सल्ला दिला आहे.

त्यामुळे पुरवणी अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले जाईल. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी मुख्यसभेपुढे ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले होते. मात्र, आता या पुरवणी अंदाजपत्रकाला स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी विरोध केल्याने आयुक्तांना झटका बसणार असल्याचे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.