Bhosari : किराणा माल लवकर न दिल्याने तिघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – किराणा दुकानदाराने माल लवकर न दिल्याने दुकानदार महिला, त्यांचे पती आणि मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना महात्मा फुले नगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी येथे रविवारी (दि. 12) दुपारी घडली.

याप्रकरणी चित्राबाई बाबुराव कांबळे (वय 45, रा. महात्मा फुले नगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सनी बबन वाघमारे, सुरज शर्मा, अक्षय नागप्पा कांबळे, गण्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही. सर्व रा. महात्मा फुले नगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी) यांच्या विराधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे महात्मा फुले नगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी येथे श्री गणेश एंटरप्रायजेस या नावाचे किराणा दुकान आहे. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या दुकानासमोर आले. किराणा मालाच्या वस्तू लवकर न दिल्याने आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. आरोपी वाघमारे याने फिर्यादी यांच्या पतीला लोखंडी रॉडने मारले. त्यात त्यांच्या तोंडाला आणि डोक्याला दुखापत झाली.

अन्य आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला लाथाबुक्यांनी मारहाण केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.