Bhosari : ॲमेझॉन कंपनीचा दहा लाखांचा माल दोन चोरटयांनी पळवला

एमपीसी न्यूज – ॲमेझॉन कंपनीच्या गोडावूनमधून लाखो रुपयांचे पार्सल भरून मोटार (गाडी) गोडाऊनच्या बाहेर पडली. दोघांनी मिळून चालकाला जबरदस्तीने खाली उतरवून मालासह मोटार पळवून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 20) पहाटे भोसरी एमआयडीसी येथील ॲमेझॉन कंपनीच्या गोडाऊन बाहेर घडली.

त्रिवणे धनुषधारी यादव (वय 28, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी येथे ॲमेझॉन कंपनीचे गोडावून आहे. या गोडावूनमधून गुरुवारी पहाटे मोटार (एम एच 43 / एडी 1591) पार्सल घेऊन खडकी येथे वितरणासाठी जात होती. पार्सल भरून मोटार गोडाऊनच्या बाहेर आली असता दोघांनी मिळून जबरदस्तीने चालकाला खाली उतरवले.

चोरट्यांनी जबरदस्तीने गाडी सह मोटरमधील पार्सल माल एकूण दहा लाखांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.