Bhosari: माजी नगरसेवक हभप विठोबा लांडे यांचं निधन

Bhosari: Vithoba Lande passed away विठोबा लांडे हे माजी आमदार विलास लांडे यांचे वडील होत.

एमपीसी न्यूज- वारकरी संप्रदायातील आणि माजी नगरसेवक हभप विठोबा सोनबा लांडे यांचे वृद्धापकाळाने आज (दि. ३०) निधन झाले. त्यांचे वय 102 होते. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे यांचे ते  वडील होत.

विठोबा लांडे वारकरी संप्रदायात होते. नगरपालिका असताना ते नगरसेवक देखील होते. जुन्या पिढीतील कार्यकर्ते होते. भोसरीतील राहत्या घरी आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान गेल्याच महिन्यात 6 मे रोजी विठोबा लांडे यांच्या पत्नी  इंदूबाई यांचे निधन झाले होते. त्यांनतर महिनाभरात विठोबा लांडे यांचे  निधन झाले आहे. लांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कै. विठोबा लांडे हे 1979 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्या मागे मुलगा माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक विश्वनाथ लांडे, तीन मुली, सून माजी महापौर मोहिनी लांडे, नातू विद्यमान नगरसेवक विक्रांत लांडे तसेच सुना व नातवंडे असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like