Cyber Crime: जालना जिल्ह्यात कोरोनाला सोशल मीडियावर जातीय, राजकीय रंग; सायबर विभागाकडून गुन्हा दाखल

Cyber ​​Crime: Corona racial, political color on social media in Jalna district; Filed a crime by the cyber department या गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात जातीय व राजकीय टिपणीचा मजकूर असणाऱ्या आशयाचे विधान आपल्या फेसबुक प्रोफाईलवरुन केले.

एमपीसी न्यूज- कोरोनाला सोशल मीडियावर जातीय, राजकीय रंग दिल्याबाबत जालना जिल्ह्यातील परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोना काळात आतापर्यंत 14 सायबर गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.

या गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात जातीय व राजकीय टिपणीचा मजकूर असणाऱ्या आशयाचे विधान आपल्या फेसबुक प्रोफाईलवरुन केले.

त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे सायबर विभागाने तात्काळ यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी 510 विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले आहेत. त्यात 265 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

आतापर्यंत सायबर विभागाने 107 पोस्ट सोशल मीडियावरून काढून टाकल्या आहेत.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी 28 जूनपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-

# व्हॉट्सॲप- 196 गुन्हे

# फेसबुक पोस्ट्स – 213 गुन्हे

# टिकटॉक व्हिडिओ- 27 गुन्हे

# ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – 10 गुन्हे

# इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- 4 गुन्हे

# अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – 60 गुन्हे दाखल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.