Mamurdi : मामुर्डीतील स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीच्या कामाचे भूमिपूजन 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शितळानगर, मामुर्डीतील देहूरोड कॅन्टोंमेट बोर्डाच्या हद्दीतील जागेतील स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाचे भूमिपूजन आज (सोमवारी) प्रभाग क्रमांक 16 मधील स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते करण्यात आले. 

नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, संगीता भोंडवे, मोरेश्वर भोंडवे व बाळासाहेब ओव्हाळ यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीच्या कामासाठी सुमारे 1 कोटी 60 रुपये खर्च येणार आहे. तसेच शंकर मंदिर ते एम.बी. कँम्प तसेच इतर देहूरोड कॅन्टोंमेट बोर्डाच्या हद्दीतील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 4 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्याचे काम देखील लवकरच चालू करण्यात येणार आहे. याशिवाय एम.बी. कँम्प येथील उद्यानासाठीही सुमारे 12 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ते कामही लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे, नगरसेविका खानोलकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.