Big B gives name to Mask : हिंदीमध्ये मास्कला काय बरं म्हणतात?

Big B gives name to Mask - What is Mask called in Hindi? मास्कचा 'हा' हिंदी अनुवाद वाचून नेटकरी चकित झाले आहेत. तुम्हीही जाणून मास्कचे हिंदी नाव...

एमपीसी न्यूज – सध्या सगळं जग करोनामय झालं आहे. पूर्वी कसं बरं होतं कोणत्याही बाह्य अवरोधाशिवाय घराबाहेर पडता येत होते. पण आता घराबाहेर पडायचे असेल तर पहिल्यांदा आठवणीने मास्क घातला जातो. अर्थातच आता उगाचच घराबाहेर पडणे बंदच झाले आहे. पण मास्क न घालता घराबाहेर पडले तर आता कायद्याने दंडदेखील ठोठावता येतो. त्यामुळे प्रत्येकजण अगदी बच्चेकंपनी सुद्धा आठवणीने मास्क घालूनच घराबाहेर पडतात.

पण या मास्कला हिंदी किंवा मराठीत किंवा इतर भाषांमध्ये काय बरं म्हणायचं हा प्रश्नच आहे ना. आता अस्खलित हिंदी कोणाला येते तर बिग बींना…त्यांची शुद्ध हिंदी कानात साठवून ठेवण्यासारखी असते. खर्ज लावून ते कविता ऐकवतात ना तेव्हा कान तृप्त होतात.

अशाच एका चाहत्याने बिग बीं ना मास्कला हिंदी मध्ये काय म्हणातात? किंवा त्याचे हिंदी अनुवाद करायचे असेल तर कसे कराल? असा प्रश्न विचारला होता. मात्र या प्रश्नावर कोणीही योग्य उत्तर दिलं नाही. अखेर बिग बीं नीच या गूढ प्रश्नाचे उत्तर दिलं आहे.

मास्कला हिंदीमध्ये ‘नासिकामुखसंरक्षक कीटाणुरोधक वायुछानक वस्त्रडोरीयुक्तपट्टिका’ असं म्हणता येईल. हा अनुवाद वाचून नेटकरी चकित झाले आहेत. अमिताभ यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.