Bhosari News : चक्रपाणी वसाहतीमध्ये राष्ट्रवादीच्या संपर्क अभियानाला मोठा प्रतिसाद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क अभियानाला प्रभाग क्रमांक 9 चक्रपाणी वसाहतीमधील नागरिकांचा मोठ्या प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी केलेल्या कामांना उजाळा दिला. 5 वर्षात भाजपने केलेल्या भ्रष्टाचारी कारभार जनतेसमोर मांडण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते संजय उदावंत यांनी केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने “प्रभाग संपर्क अभियान” चालू करण्यात आले. त्याअंतर्गत प्रभाग क्रमांक 9 चक्रपाणी वसाहतीमध्ये बैठक झाली. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, माजी नगरसेवक रवी लांडगे, राहुल भोसले, संजय वाबळे, पंडित गवळी, विनायक रणसुभे, भरत लांडगे, नंदूतात्या शिंदे, निवृत्ती शिंदे, शेखर गव्हाणे, प्रकाश कराळे, अंकुश दीघे, नवनाथ डफळ, दिपक साकोरे, राकेश देवकर, लक्ष्मण गुळवे, संदिप पलांडे,काळूराम खेडकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अजित गव्हाणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रभाग क्रमांक 9 च्या वतीने सत्कार करण्यात आला. संजय उदावंत म्हणाले, रवी लांडगे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. जागा विकत घेऊन नागरिकांना रस्ता करुन दिला जात आहे. प्रभागातील नागरिकांना पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.