Pimpri News : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचा “ई- गर्व्हनन्स अँड इकोनॉमी” पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत भारत सरकारचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय निर्माण भवन, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित “ 7 व्या स्मार्ट सिटीज इंडिया 2022” आणि “29 व्या कन्व्हर्जन्स इंडिया 2022” एक्स्पोमध्ये पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पीसीएमसी स्मार्ट सारथी उपक्रमाला “ई- गर्व्हनन्स अँड इकोनॉमी” पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. बिहार राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री जिबेश कुमार, वीज मंत्रालयाचे सहसचिव अंजु भल्ला यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

नवी दिल्ली येथे वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) द्वारे देशातील 100 स्मार्ट सिटींसाठी एक्सो भरविण्यात आला होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी प्रकल्प, उपक्रम आणि उपलब्धी दाखवण्यासाठी डिस्प्ले स्टॉल लावण्यात आला आहे. स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांनी सहभाग नोंदविला होता.

कोविड काळात प्रशासनाची महत्त्वाची भूमिका, माहिती गोळा करण्यासाठी अनेक नवकल्पनांचा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा केलेला वापर, द्वि-मार्गी संप्रेषणाची तरतूद, व्यवस्थापन आणि समन्वय, भविष्य सूचक मॉडेलिंग आणि सज्जता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तसेच कॉर्पोरेट क्षेत्रांना होणारा तंत्रज्ञानाचा फायदा, स्टार्टअप्स मिळणारे प्राधान्य, नागरिकांना राहण्यायोग्य आणि शाश्वत शहरे निर्माण करण्यासाठी योग्य उपाययोजना, स्मार्ट शहराची संकल्पना, तसेच, सिटी लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये शहरी स्मार्ट सिटी सोल्यूशन्स व स्मार्ट सिटीज इन्फ्रास्ट्रक्चर, स्मार्ट सिटी फ्रेमवर्कसह स्मार्ट आयसीटी, स्मार्ट एनर्जी, बिल्डिंग्स, ट्रान्सपोर्ट, वॉटर आणि क्लीन इंडिया इ. इंडस्ट्री यासह शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवून प्रभाव पाडणाऱ्या प्रकल्पांचे व्हीडीओद्वारे या तीन दिवसीय एक्स्पोमध्ये सादरीकरण करण्यात आले होते. तसेच, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना वेळेत व सातत्यपूर्ण माहिती मिळण्यासाठी महापालिकेच्यावतीने पीसीएमसी स्मार्ट सारथी ऍप उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या माध्यमातून, युटिलिटी अपडेट्स, ऑनलाइन कर भरणे, ऑनलाइन प्रमाणपत्रे तसेच ऑनलाईन तक्रार निवारण सेवा देण्यात येते. नागरिक पीसीएमसी कार्यालयात न जाता तक्रारीची स्थिती जाणून घेऊ शकतात. तसेच, जीपीएस वापरून जवळपासची सरकारी कार्यालये, रुग्णालये, शाळा, सार्वजनिक शौचालये, रक्तपेढ्या, उद्याने, सीएफसी सेंटर शोधू शकतात. त्याचबरोबर, व्यापारी, भागीदारी संस्था, आरोग्य सेवा प्रदाते/ रुग्णालये आणि क्लब, स्थानिक विक्रेते, व्यवसाय आणि ठिकाणे यांच्यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी उपयुक्त्‍ ठरत आहे. नागरिकांना वेळेत सोयी- सुविधा उपलब्ध करण्यासाठी लाभदायी ठरत असलेल्या पीसीएमसी स्मार्ट सारथी उपक्रमाला एक्स्पोच्या शेवटच्या दिवशी 25 मार्च रोजी स्मार्ट सिटीज इंडियाद्वारे “ई- गर्व्हनन्स अँड इकोनॉमी” पुरस्कार म्हणून घोषणा करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.