Chinchwad : ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे 

एमपीसी न्यूज – चिंचवडगावातील ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळातर्फे 15 सभासदांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

चिंचवडगाव येथे झालेल्या कार्यक्रमाला नगरसेविका अश्विनी चिंचवडे, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाचे कोषाध्यक्ष रमेश देव, जगदीश मुंदडा, राजेंद्र पोफळे उपस्थित होते. रमेश देव यांनी मंडळाच्या आर्थिक शिस्तीचा आढावा घेतला. तसेच मंडळाला आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन केले. अश्विनी चिंचवडे यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. रमेश पाटील यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.

शामकांत खटावकर, संभाजी वाठारकर, शहाजी कांबळे, बाळासाहेब मुळीक, काशिनाथ झोपे, हनुमंतसिंग परदेशी, मनोहर बाळापुरे यांनी संयोजन केले. गुलाबराव धनोरे यांनी प्रास्ताविक केले. तर, विक्रांत ओतारी यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमांची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.