Bollywood: ‘मी हजबंड मटेरियल आहे’, असं कोणता बरं अभिनेता म्हणतोय?

Bollywood: Actor Vicky Kaushal says, 'I am Husband Material'!

एमपीसी न्यूज – सध्याच्या तरुणींची ‘दिल की धडकन’ म्हणजे अभिनेता विकी कौशल. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’,  ‘संजू’ या चित्रपटातून तो घराघरात पोचला आणि तिथून डायरेक्ट तरुणींच्या दिलात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सध्या सोशल मीडियावर विकीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून तरुणींमध्ये त्याची लोकप्रियता किती आहे हे दिसून येतं. इतकंच नाही तर या व्हिडीओत त्याने स्वत:ला  ‘हजबंड मटेरिअल’ म्हटलं आहे.

उत्तम अभिनय शैली आणि दर्जेदार कथानकाची निवड यामुळे विकीचा स्वतंत्र असा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. केवळ देशातच नाही तर विदेशातही त्याचे अनेक चाहते आहेत. विशेष म्हणजे तरुणींमध्ये त्याची सर्वाधिक क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं.

लॉकडाऊनच्या या काळात नवे-जुने चित्रपट परत परत पाहिले जातात. आणि त्यात नेहमी जास्त पाहिला जाणारा चित्रपट म्हणजे ‘उरी, द सर्जिकल स्ट्राइक’. त्यातल्या विकीच्या अप्रतिम अदाकारीने सगळ्यांनाच भुरळ घातली. त्यात अजूनही सिंगल असणा-या विकीवर डोरे डालण्यासाठी तरुणी तयारच असतात.

विकी आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांनी काही काळापूर्वी टोरंटो इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी विकीला पाहून त्याच्या असाच एका कट्टर चाहतीने मोठ्या आवाजात त्याला ‘आय लव्ह यू’ म्हटलं होतं. त्यावर अभिषेकने त्या चाहतीला मजेमध्ये विकी अजून लहान आहे असं म्हटलं. यावेळी तिला उत्तर देताना विकीने गमतीने मी ‘हसबंड मटेरिअल’ असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, विकी ‘मसान’, ‘संजू’, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटांमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. अलीकडेच  प्रदर्शित झालेल्या ‘भूत’ या चित्रपटामुळे त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली असून तो बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.