Pune News : पुणे महापालिकेतर्फे ग्रंथ प्रदर्शन व काव्य स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज –  पुणे महापालिकेच्या वतीने 24 ते 27 जानेवारी (Pune News) दरम्यान ग्रंथ व काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यासाठी महापालिकेच्या वतीने लवकरच अर्ज स्विकारले जाणार आहेत.

सुरुवातीला पुणे महापालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समिती तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये मराठी पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.पुणे शहरातील प्रकाशक, शासकीय, निमशासकीय संस्था यांना सहभाग घेता येणार आहे. हे प्रदर्शन 24 ते 27 जानेवारी दरम्यान सिंहगड रस्ता येथील स्व. पु. ल. देशपांडे उद्यान येथे पार पडणार आहे.

यासाठी पुणे शहरातील प्रकाशक, शासकीय, निमशासकीय संस्था इत्यादींना 10 x 10 फुटाचे प्रत्येकी एक या प्रमाणे 50 गाळे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. (Pune News) यासाठी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर हे गाळे वाटप करण्यात येणार आहे. अर्जासोबत पुस्तकांची सूची जोडणे आवश्यक आहे.या प्रदर्शनासाठी 23 जानेवारी दुपारी एक वाजेपर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत.

तसेच 27 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता पुणे महापालिका भवन येथील  श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (जुने) येथे काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.(Pune News) स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कवी यांना मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या स्वलिखित काव्य संग्रहातील (पुस्तक) केवळ एक कविता स्वतः सादर करावी लागणार आहे. तसेच काव्य स्पर्धेसाठी येताना प्रकाशित पुस्तकाची (काव्य संग्रह) प्रत आणणे आवश्यक आहे.

स्पर्धेत विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिक प्रथम क्रमांक 5 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 3 हजार रु. तर  तृतीय क्रमांकासाठी 2 हजार रुपये तसेच विजत्यांना सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे. काव्य संग्रहाचे मुखपृष्ठ, कविता व आधारकार्ड यांची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. काव्य स्पर्धेसाठी 25 जानेवारी पर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत.

 

इच्छुकांना ग्रंथ प्रदर्शन व काव्य स्पर्धेसाठी अर्ज पाठविण्याचा पत्ता

पत्ता:- माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे- 411005

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.