Pune : पुरूषांच्या आरोग्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी बीर्डो-थॉन 2018 हाफ मॅरेथॉन

एमपीसी न्यूज – प्रत्येक भारतीय पुरूषाने आपल्या परिवाराकरता स्वतःच्या स्वास्थ्य संदर्भात फिट राहण्याची गरज असून यासाठी प्रोत्साहन आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी आज बीर्डो-थॉन सिझन 2 या हाफ मॅरेथॉनचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते.
पुरूषांनी स्वतःच्या फिटनेस संदर्भात जागरूक राहावे आणि आरोग्यदायी जीवन जगावे यासाठी एक प्रोत्साहन म्हणून बीर्डो-थॉन हाफ मॅरेथॉनचे निमित्त होते.

बिअरडोथोनमध्ये 2000 लोकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये पुरुषांबरोबर महिलांनी सुद्धायामध्ये सहभाग नोंदवला. या मॅरेथॉनमध्ये 5 कि. मी, 10 कि. मि. आणि 21 कि. मी. अंतरावर रेस झाल्या.
या हाफ मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ प्रसिद्ध भारतीय मॉडेल आणि फिटनेसचे प्रोत्साहक मिलिंद सोमन यांच्या पत्नी अंकिता कोवंर-सोमन यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.