Pune – तीन गावठी कट्टे व अठरा जिवंत काडतुसांसोबत दोघे जण अटक.

एमपीसी न्युज – मध्यप्रदेशातील दोन व्यक्तीकडून तीन गावठी कट्टे व अठरा जिवंत काडतुसे असा 1 लाख 59 हजार रुपयांचा माल जप्त केला. ही कारवाई काल रविवारी (दि.20) पाषाण लिंक रोड येथे केली गेली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पाषाण लिंक रोड येथे मध्यप्रदेशातील दोन व्यक्ती गावठी कट्टे व काडतुसे विक्रीस येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उप निरिक्षक सुनील दोरगे यांना काल सोमवारी (दि.20) गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यांनी याबद्दलची माहिती गुन्हे शाखेच्या आयुक्तांना कळवताच यावर सदर ठिकाणी कारवाई करण्याची सूचना त्यांना दिली गेली.त्याप्रमाणे सुनील दोरगे हे अंमली पदार्थ विरोधी पथकातील स्टाफ सोबत बाणेर पाषाण लिंक रोडवरील वैजनाथ टी हाऊस या दुकानासमोर पोहचले. तिथे मध्यप्रदेशातील दोन इसम नरेंद्रकुमार मिहिलाल राजपुत (वय 25, रा.मध्यप्रदेश) आणि योगेंद्रसिंग बाबूलाल राजपुत (वय 21 रा.मध्यप्रदेशा) यांच्या ताब्यातून एकूण तीन गावठी कट्टे व अठरा जिवंत काडतुसे असा तब्बल 1 लाख 59 हजार रुपयांचा माल जप्त केला. याबाबत पुढील तपास चतुःश्रुंगी पोलीस करत आहेत.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उप आयुक्त ज्योतिप्रिया सिंह, पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे व पोलीस कर्मचारी अविनाश शिंदे, महेंद्र पवार, राजु पाटील, प्रफुल्ल साबळे, शिवाजी राहिगुडे, सचिन चंदन, विठ्ठल खिलारे, राहुल जोशी यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.